मराठी विभाग व वाड़मय मंडळ /DEPARTMENT OF MARATHI

Assistant Professor

Assistant Professor.

Assistant Professor

Assistant Professor

बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या उद्देशाने स्थापन झालेले हे महाविद्यालय आहे. मराठी विभागाची स्थापना दिनांक 2 जुलै 1956 रोजी झाली. पूर्वीच्या पश्चिम खान्देशात सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेने स्थापन झालेले हे महाविद्यालय. महाविद्यालयातील अनेक विभाग आज सर्व दृष्टीने समृद्ध आहेत. मराठी विभाग हा त्यापैकी एक मराठी विभागात अनेक नामवंत कवी, लेखक, प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातच आमचा विभाग एक समृद्ध विभाग म्हणून ओळखला जातो. प्रा.पुरुषोत्तम पाटील (कवी, संपादक कवितारती, विचारवंत), प्राचार्य सदाशिव माळी (बोलीभाषा अभ्यासक), प्रा. डॉ. कुसुमाकर शिंपी (कवी, मराठी व संस्कृत भाषा अभ्यासक), प्रा.मा.य. वैद्य (लेखक, विचारवंत), प्रा. अनिल सोनार (नाटककार व विडंबनकार),प्रा. संतोष चव्हाण (कवी व भाषाविज्ञानाचे अभ्यासक) अशा मान्यवरांमुळे मराठी विभाग एक समृद्ध विभाग म्हणून ओळखला जातो.

मराठी विभाग व मराठी वाड़मय मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी मराठी भाषा दिन, मराठी भाषा पंधरवाडा हे विशेष कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच मराठी वाड़मय मंडळाच्या वतीने विविध उपक्रमही राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाच्यादृष्टीने नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सर्टिफिकेट कोर्स इत्यादी उपक्रम तसेच साहित्य जगतातील साहित्य संमेलने, काव्य संमेलने, नाट्यसंमेलने, विविध पुरस्कार या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वागत व निरोप समारंभाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काव्यवाचन, नाट्यवाचन, शुद्धलेखन, निबंध स्पर्धा असे उपक्रम आयोजित केले जातात.