UNDER GRADUATE

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांना संलग्न असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात पदवी स्तरावरील .३ वर्षांचे (६ सत्रे) कला आणि वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठाचे परिपत्रक ११४/२००३ व या परिपत्रक संदर्भातील अद्ययावत जोड्पत्रांनुसार प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष प्रवेशाची पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश व पात्रता संदर्भात विद्यापीठ परिपत्रक १०४/२०१२ दि.११.०४.२०१२ नुसार कार्यपद्धती विद्यार्थांना बंधनकारक करण्यात आली आहे. एच.एस.सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला प्रथम वर्षाला प्रवेश दिला जातो. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती या अभ्यासक्रमाकरिता लागू करण्यात आली आहे. सदर तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यापीठामार्फत पदवी प्रदान करण्यात येते. कला शाखेतील विद्यार्थांकारिता पदवी स्तरावर इंग्रजी, मराठी, संस्कृत, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, भूगोल, इतिहास व संरक्षणशास्त्र या विषयांचे विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सामान्य स्थावरील उर्दू, लोकप्रशासन व संस्कृतीचा इतिहास विषय उपलब्ध आहेत. स्पेशल विषयांकरिता मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे संबंधित विषयात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थांना मागणीचे अग्रक्रमानुसार प्रवेश दिला जातो. वाणिज्य शाखेतील विद्यार्थांकारिता उपयुक्त असलेले चार कंपल्सरी विषय आणि बँकिंग, मार्केटींग, इन्शुरन्स व भूगोल हे ऐच्छिक विषय उपलब्ध आहेत.

UG COURSES OFFERED

BA Subjects
EnglishMarathi
HindiSanskrit
EconomicsPolitical Science
PsychologyGeography
HistorySociology
Defence StudiesUrdu(General)
Mass Communication & Journalism
B.Com Subjects